शिवसेना आमदाराच्या पत्नीचा घातपात का आत्महत्या?

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी यांचा मृतदेह रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना आमदाराच्या पत्नीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. तीने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तीचे पती मंगेश कुडाळकर हे मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रजनीचे वय 42 वर्षे होते. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. (Shiv Sena MLA's wife's body found hanging, police suspect suicide)

Crime News
...म्हणून अमरावतीच्या अचलपूर शहरात 144 कलम लागू

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार मंगेश यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांचा मृतदेह (Death Body) रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास आढळून आला. ती कुर्ला (पूर्व) येथील नेहरू नगर येथील डिग्निटी कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत राहात होती. मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात रजनीने आत्महत्या केल्याचे समजते. मात्र यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कसून चौकशी केल्यानंतरच काही कळेल.

याप्रकरणी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सने कौटुंबिक कलहाकडे लक्ष वेधले आहे, परंतु पोलिसांनी त्यास पुष्टी दिलेली नाही.

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचे नाव गेल्या वर्षी सेक्स चॅट प्रकरणात आले होते. फॅक्ट चॅटच्या नावाखाली आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली होती. त्यांनी आमदाराची 5 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आमदाराच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) आरोपीला भरतपूरच्या सिकरी परिसरातून पकडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनी यांच्या मुलाचा काही महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू (Accident Death) झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com