महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरुन (Suffocation) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रिक जनरेटरमधून निघालेल्या कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे कुटुंबातील सदस्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि काही वेळातच त्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. (Six members of the same family die while starting the generator in Chandrapur)
चंद्रपुरच्या दुर्गापुरमध्ये घडलेल्या या घटनेत रमेश लष्कर (वय 25), अजय लष्कर (वय 21), लखन लष्कर (10), कृष्णा लष्कर (आठ), पूजा लष्कर (वय 14) आणि माधुरी लष्कर (वय 20) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर कुटूंबातील एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दरम्यान, सोमवारी रात्रीपासून पावसामुळे चंद्रपुरमधील दुर्गापूरच्या काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला होतो. त्यामुळे कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याने घरात असलेले विद्युत जनरेटर चालू केले. इलेक्ट्रिक जनरेटरमधून त्यानंतर या जनरेटर मधुन निघालेल्या कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.