MSRTC: महाड येथील धक्कादायक प्रकार, प्रवाशांच्या जिवाशी खेळ

महाड पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना अशी बेफिकीर करणे योग्य नाही.
MSRTC: महाड
MSRTC: महाडDainik Gomantak
Published on
Updated on

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाभस पडत आहे. अशातच रायगड जिल्ह्यात काल अतिवृष्टीने मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे जिल्ह्यातील नद्याना पुर आला होता. नद्या ओसंडून वाहत असल्याने धोक्याची पातळी या भागातील काही नद्यांनी ओलंडली होती. (ST bus driver heading towards flooded area in Mahad endangered lives of the passengers)

दरम्यान महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील नद्याही ओसंडून वाहत होत्या. पुलावरून नदीचे पाणी ओसंडून वाहत असताना खाडी पट्यातून महाडकडे जाणाऱ्या एसटी (MSRTC) बस चालकाने प्रवाशांचा आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून बस पुरात टाकली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडता बस चालकांने एसटी बस सुखरूप बाहेर काढली. मात्र पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना अशी बेफिकीर करणे योग्य नाही.

दोन दिवसापासून रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्याही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. असे असतानाही महाड एसटी आगारातील एका बसचालकाने आपला आणि प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला असे करून त्याने प्रवाशाच्या आणि स्वत:च्या जिवाशी खेळच केला असं म्हणायला हरकत नाही.

खाडी पाट्यातून एसटी बस चालक दुपारी काही मोजक्या प्रवाशांसह महाड कडे जात होता. त्यावेळी खाडी पट्यातील नद्यांना पुर आला होता आणि त्या ओसंडून वाहत होत्या. खाडी पट्यावरील पुलावरून नदीचे पाणी वाहत होते. हे दिसत असतांनाही बस चालकाने या पाण्यातून बस टाकली. काही क्षणासाठी ही बस पुलाच्या मधोमध अडकली त्यामुळे प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला होता, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना न होता बस पाण्याबाहेर आणली.

MSRTC: महाड
कोकणाला पावसाने झोडपले, सिंधुदुर्गला ऑरेंज तर रायगडला रेड अलर्ट

दरम्यान रायगडातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज देण्यात आला आहे. कोकणाला (Konkan) काल दिवसभर पावसाने झोडपल्यानंतर आता राज्यात देखील मॉन्सून सक्रीय झाला आहे. आजही कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज देखील कोकणासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल या नद्या भरुन वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठ राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. सिंधुदुर्गमध्ये 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com