Sindhudurg: वैद्यकीय उपचारासाठी आता सिंधुदुर्गातून गोव्यात जावं नाही लागणार; मंत्रालयात पार पडली महत्वाची बैठक

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश.
Sindhudurg: वैद्यकीय उपचारासाठी आता सिंधुदुर्गातून गोव्यात जावं नाही लागणार; मंत्रालयात पार पडली महत्वाची बैठक
Medical Education minister MantralayDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: वैद्यकीय उपचारासाठी सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्यांची परवड आता थांबणार आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले आहेत. याबाबत मुश्रिफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, ऑनलाइनद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२९ जानेवारी) मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत उपस्थित राहून प्रलंबित प्रश्नांबाबत काही सूचना दिल्या, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

Sindhudurg: वैद्यकीय उपचारासाठी आता सिंधुदुर्गातून गोव्यात जावं नाही लागणार; मंत्रालयात पार पडली महत्वाची बैठक
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय? यातून सर्वसामान्य जनतेला काय मिळतं?

वैद्यकीय महाविद्यालयास पुरेशी साधनसामुग्री पुरवावी. तसेच रिक्त पदे, वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा, अशा सूचना दिल्या.

यावर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले, अशी माहिती राणे यांनी एक्सवरील एका पोस्टमधून दिली आहे.

Sindhudurg: वैद्यकीय उपचारासाठी आता सिंधुदुर्गातून गोव्यात जावं नाही लागणार; मंत्रालयात पार पडली महत्वाची बैठक
Ranji Trophy: गोमंतकीय खेळाडूंनी साधली 'किमया'! अर्जुन तेंडुलकरसह गोव्याच्या पाहुण्या खेळाडूंकडून रणजी स्पर्धेत घोर निराशा

प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री मुश्रिफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी.

ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, अशा सूचना मुश्रिफ यांनी दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com