Sindhudurg: 'करिअरसाठी घर सोडतोय, मला शोधू नका, 5 वर्षांनी परत येतो'; दहावीच्या परीक्षेनंतर अल्पवयीन मुलगा बेपत्ता

Sindhudurg News: मुलाने यापूर्वी ट्रेडींगमध्ये करिअर करण्याची इच्छा वडिलांना बोलून दाखवली होती. दरम्यान, आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता.
Missing child Class 10 Maharashtra
Sindhudurg missing teenDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: "ट्रेडींग क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडतोय, मला शोधू नका", अशा आशयाची चिठ्ठी लिहून अल्पवयीन मुलाने घर सोडल्याचा प्रकार कुडाळ तालुक्यातून समोर आला आहे. रविवारी (१३ एप्रिल) हा अल्पवयीन मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. दहावीची परीक्षा संपल्यानंतर मुलाने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

अल्पवयीन मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी होता. दहावीची परीक्षा संपल्यानंतर १६ मार्च रोजी तो त्याच्या मूळ गावी आला होता. दरम्यान, १३ एप्रिल रोजी घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने एक चिठ्ठी लिहून घर सोडले. आई - वडिलांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही, अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

Missing child Class 10 Maharashtra
Goa Murder Case: राय येथील खून प्रकरण; पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या दुसऱ्याही संशयिताला अटक

काय लिहलंय चिठ्ठीत?

"ट्रेडींग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मला घर सोडावं लागतंय. पण, माझी काळजी करु नका. पाच वर्षात मी परत येईन. मला शोधत बसू नका. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे", असे या मुलाने चिठ्ठीत लिहले आहे.

Missing child Class 10 Maharashtra
Babasaheb Ambedkar Bhavan Goa: पर्वरीत होणार आंबेडकर भवन; 10 कोटी रुपयांची तरतूद, CM सावंत यांची माहिती

शिक्षण पूर्ण करण्याचा वडिलांनी दिला होता सल्ला

बेपत्ता मुलाने यापूर्वी ट्रेडींगमध्ये करिअर करण्याची इच्छा वडिलांना बोलून दाखवली होती. दरम्यान, आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता. दरम्यान, मुलाने अचानक घर सोडण्याचा निर्णय घेतल्याने आई - वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com