Vasco police: सजग पोलिसांमुळे गोवा सुरक्षित! कृष्णा साळकरांची स्तुतीसुमने; वास्को स्थानकात कामगिरीचे कौतुक

Krishna Salkar: गोवा पोलिसांमुळे गोवा सुरक्षित असल्याचा विश्र्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचे काम केल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.
Vasco Police
Vasco PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा सुरक्षित नाही, असे वातावरण विरोधकांनी गोव्यासंबंधी केले होते. त्या गोष्टीला छेद देताना गोवा पोलिसांमुळे गोवा सुरक्षित असल्याचा विश्र्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचे काम केल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

तर सामाजिक सुरक्षितता सुनिश्र्चित करण्याची गरज पडल्यास आम्ही प्राण देण्यास तयार असल्याचे भावनिक उदगार वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी काढले.

बायणा येथील दरोडा प्रकरणातील सातपैकी सहाजणांना पोलिसांनी अटक करून लुटलेल्या ऐवजापैकी बराच ऐवज जप्त केला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेताना यापूर्वी आमदार संकल्प आमोणकर काही पोलिस अधिकारी व पोलिसांचा सत्कार केला होता.

शुक्रवारी (ता.५) वास्को पोलिस स्थानकात आयोजिलेल्या सत्कार कार्यक्रमात वास्कोचे आमदार साळकर यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

त्यांनी उपअधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक यांच्यासह उपनिरीक्षक, साहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार, शिपाई तसेच होमगार्ड वगैरेंचा सत्कार केला. याप्रसंगी मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक दीपक नाईक, नगरसेवक अमेय चोपडेकर, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, वास्को भाजप मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ कासकर, उमेश साळगावकर, संदीप नार्वेकर आणि इतर उपस्थित होते.

Vasco Police
Bicholim Police Station: अभिमान! डिचोली स्थानक देशात पाचव्या क्रमांकावर; उत्कृष्ट पोलिस स्थानकांमध्ये निवड Watch Video

पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत असल्याने मनाला चांगले वाटत असल्याचे गुरुदास कदम यांनी सांगितले. त्यांनी महासंचालक महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक वर्षा वर्मा, दक्षिण गोव्याचे अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व घेतलेल्या परिश्रमामुळे आम्ही याप्रकरणाचा छडा लावू शकल्याचे सांगितले.

निरीक्षक नाईक म्हणाले की, एखाद्या प्रकरणाचा छडा लावला की आमचे कौतुक होते. तसेच कौतुक या प्रकरणाच्या तपासात सहभागी झालेल्या वरिष्ठांपासून शिपाई, होमगार्ड यांचेही कौतुक होण्याची गरज आहे.

Vasco Police
Delhi Police Arrest 3 Terrorists: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई, 'ISI'शी संबंधित 3 दहशतवाद्यांना अटक

भिवपाची गरज ना!

गोवा पोलिसांनी दरोडा प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत असल्याचे साळकर म्हणाले. त्यांच्या कामगिरीने जनतेला घाबरण्याची गरज नसल्याचे दाखवून दिले आहे. पोलिसांनी लहानसहान गोष्टींवरून टीका केली जाते. तथापि पोलिस जेव्हा चांगली कामे करतात, तेव्हा त्यांच्या कामाचे कौतुक करण्याची गरज असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले. पोलिस स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे संरक्षण करतात. त्यांनी हे काम असेच सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com