राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आजच उमेदवार जाहीर करणार ?

संभाजीराजे छत्रपती यांच्या भुमिकेकडे सर्वांच लक्ष
Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje ChhatrapatiDainik Gomantak
Published on
Updated on

गेले दोन - तीन दिवस महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडी अद्याप सुरुच आहेत. कारण राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवाराचे नाव आज संध्याकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाची देण्यात आलेली मुदत संपली आहे. आता ही जागा ग्रामीण भागातील जेष्ठ नेत्याला देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ( Shiv Sena will announce its candidate for the sixth Rajya Sabha seat today? )

संभाजीराजे छत्रपतींना शिवसेना पक्षप्रवेश नाकारल्याने ते नेमकी काय भुमिका घेणार ? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण संभाजीराजे यांनी मराठा समाज आरक्षण, मराठा समाजाच्या समस्यांसांठी आंदोलन छेडले होते. यामूळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ही संभाजीराजे यांच्यासाठी झटताना दिसत आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
मंकीपॉक्सची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट

शरद पवार यांनी स्पष्ट केली भुमिका

शिवसेनेच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छाही बोलावून दाखवली होती. यातच संभाजीराजे यांनी शिवसेनेतील प्रवेशाची शक्यता नाकारल्याने ही जागा ग्रामीण भागातील जेष्ठ नेत्याला देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
मडगावसह फातोर्डा आता सीसीटीव्ही निगराणीखाली येणार

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सक्रिय

मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी शरद पवारांची भेट घेतली होती. व राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छा आहे. शिवसेना पुरस्कृत किंवा शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारालाच राष्ट्रवादी पाठींबा देणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com