सुमारे दोन ते तीन वर्षे कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते. मात्र सद्या जगातील बहूतांशी देशात कोरोना संक्रमण फैलाव मंदावला आहे. मात्र आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कारण बेल्जियम, अमेरिका, ब्रिटन या देशात मंकीपॉक्सने आपले पाय चांगलेच रोवले आहेत.WHO च्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. (The terror of the monkeypox; Alert to states from central government )
केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक जारी केली आहे. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभाग मंकीपॉक्सबाबत सतर्क होताना दिसत आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील अॅडव्हायझरी जारी केली आहे.
महाराष्ट्रात मंकीपॉक्स संदर्भात जारी केलेली मार्गदर्शक तत्वे पुढील प्रमाणे
गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.
रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.
जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय ?
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
सुमारे दोन ते तीन वर्षे कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यात मानवी जीवन पूर्वपदावर येत आहे. जगातील बहूतांशी देशात कोरोना संक्रमण थांबले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनामधून सावरतो न सावरतो, तोच ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सनं धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. फक्त एका इंग्लंड शहरात मंकीपॉक्सचे 11 रुग्ण आढळले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.