मुंबई : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांचा निकाल लागला असून पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता येणार आहे. तर पंजाबमध्ये आदमी पार्टी सत्ता स्थापण करणार आहे. तर या निवडणूकीत देशातील जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसची वाताहत झाली. अशीच अवस्था महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष तथा मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेची झाली आहे. पाच राज्यापैकी गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये शिवसेनेने आपले नशिब आजवले होते. मात्र तेथील जनतेने शिवसेनेला नाकारले. तर गोव्यात सेनेला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. त्यावरून सेनेवर भाजप आणि पक्षातील नेते तोंडसुख घेत आहेत. दरम्यान गोव्यातील निकालाचा मुद्दा धरत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेला लक्ष करताना त्यांना पुन्हा भाजपशी हात मिळवणी करण्याचा सल्ला देत काँग्रेसवर जोरदार टीका केली. (Shivsena should come with BJP says Ramdas Athawale)
यावेळी आठवले यांनी, शिवसेनेची स्पर्धा नोटा (NOTA) बरोबर सुरू असून गोव्याने (Goa) सेनेला नाकारलं आहे. लोकांसाठी काम केलं तरच लोक मतदान (Vote) करतात हे ही दिसून आल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेला (Shivsena) इशारा देताना, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने अडीच वर्षाच्या फार्म्युल्याचा अवलंब करून भाजप (BJP) सोबत यावं, असे म्हटले आहे. तर अपेक्षेप्रमाणे चार राज्यात आमची सत्ता आली आहे. सेनेने पुन्हा असं आव्हान दिलं तर त्यांचा सुपडा साफ होईल. 2024 मध्येही आमचीच सत्ता येईल, आम्ही सर्वांचा पराभव करू, असे आठवले यांनी म्हटले आहे.
यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका करताना, काँग्रेसला आता वयश्री योजनेची गरज असून गांधी कुटुंबा व्यतिरिक्त अध्यक्ष देण्याची गरज आहे. काँग्रेसने भाजपला (BJP) आव्हान देऊ नये. पाच राज्यातील आलेल्या निकालावरून गांधी (Gandhi) कुटुंबाचं आकर्षक संपल्याचे दिसत असल्याचे आठवले म्हणाले.
तर आपण, मी परमेश्वराचे आभार मानतो, त्याने मला दूरदृष्टी दिली. मी आधीच भाजपात आलो आहे. महाराष्ट्रात काँग्रेस लाचार पक्ष असून राष्ट्रवादी (NCP) आणि सेनेच्या बिन बोलवलेल्या लग्नातील ते वराती झाल्याची टीका त्यांनी काँग्रेसवर (Congress) केली आहे. त्याबरोबर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शिवसेनेवर करताना, सेनेची मंडळी करमणुकीचे साधन आहे असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.