"बाबासाहेब पुरंदरे यांना माझा साष्टांग नमस्कार" मोदींच्या बाबासाहेबांना मराठमोळ्या शुभेच्छा!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा (Babasaheb Purandare) जनशताब्दी सोहळा आज पुण्यात पार पडला या सोहळ्याला लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजनही (Sumitra Mahajan) आवर्जून उपस्थित होत्या.
Babasaheb Purandare 100th birthday: PM Modi to Sachin Tendulkar, celebs wish the legend
Babasaheb Purandare 100th birthday: PM Modi to Sachin Tendulkar, celebs wish the legendDainik Gomantak

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा (Babasaheb Purandare) जनशताब्दी सोहळा आज पुण्यात पार पडला या सोहळ्याला लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजनही (Sumitra Mahajan) आवर्जून उपस्थित होत्या. तसेच यावेळी देशातील राज्यातील अनेक दिग्गजांनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या ज्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) , आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar), राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदी मान्यवरांचा समावेश आहे.(Babasaheb Purandare 100th birthday: PM Modi to Sachin Tendulkar, celebs wish the legend)

विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले होते.

मोदींच्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मराठीतून शुभेच्छा

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना मराठीतून शुभेच्छा दिल्या. पुण्यातील या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहत मोदींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना साष्टांग नमस्कार करतो अशी आपल्या भाषणाची सुरूवात केली.

तसेच पंतप्रधान पुढे म्हणले की , १०० वर्षामध्ये पदार्पण केल्याबद्दल बाबासाहेबांना मी अभिवादन करतो. या विशेष आयोजनाबद्दल सुमित्रा महाजन यांचा आभारी आहे. शताय़ु जीवनाची कामना प्रगल्ब करते. मानवाच्या जीवनासाठी बाबासाहेबांचे जीवन पूरिपूर्ण असून आपला देशही 75 व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे. इतिहास हा प्रत्येक मानवापर्यंत घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी योगदान दिले आहे. बाबसाहेबांचं मार्गदर्शन अनेक वर्ष मिळत राहो. त्यांनी शिवरांयाचा इतिहास देशातील देशातील प्रत्येक जन जनापर्यंत पोहोचवला. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट करण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला. र-तसेच मी नेहमी अहमदाबादमध्ये बाबासाहेबांच्या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित राहत असे. त्याचबरोबर जाणता राजा नाटक पाहण्यासाठी मी पुण्याला आलो होतो. शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन राहणार आहे. इतिहासाबरोबर वर्तमानाची काळजी बाबासाहेबांनी केला. शिवचरिच्र सांगण्याची पद्धत ही अतुलनीय आहे. असे सांगत मोदींनी बाबासाहेब पुरंदरे यांना उत्तम आयुष्याच्या शुभेच्छाही दिल्या.

Babasaheb Purandare 100th birthday: PM Modi to Sachin Tendulkar, celebs wish the legend
कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही दिल्या बाबासाहेबांना शुभेच्छा

शाळकरी वयात ज्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेला महाराजांचा इतिहास वाचला त्या सगळ्यांना मन प्रसन्न करणारी हि गोष्ट आहे. महाराजांचा परिचय ज्यांनी घरोघरी पोहोचवला ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. शिवाजी महाराज हे त्यांचे ध्यास आणि दैवत आहेत. इतिहास सगळ्यांसमोर यावा यासाठी त्यांनी अक्खा महाराष्ट्र पालथा घातला. बाबासाहेबांची प्रेरणा ही आमच्यासाठी अमूल्य आहे. असे म्हणत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी बाबासाहेबांना शुभकामना दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्याही बाबासाहेबांना शुभेच्छा -

तर शतायुषी सरस्वती पुत्र म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बाबासाहेबांना शुभेच्छा संदेश पाठवला होता.शतकी पदार्पणाबाबत मी बाबासाहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्याबाबत आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो असे म्हणत त्यांनी आपला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

देवेंद्र फडणवीसांनीहि दिल्या बाबासाहेबांना शुभेच्छा-

तब्बल तीन पिढयांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा सांगून आपले योगदान देणारे आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना मी जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना आणखी दीर्घायुष्य लाभो हिच आई तुळजाभनीच्या चरणी प्रार्थना करतो.

भारतरत्नाच्याही बाबासाहेबांना शुभेच्छा -

बाबासाहेबांना ऑनलाइन शुभेच्छा देतानाच मी तुम्हाला इथूनच वाकून नमस्कार करत असे म्हणत क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर याने देखील बाबासाहेबांना आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com