शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे दोघे आपल्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. सध्या चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेनेची टोलेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या आपल्या सदरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या याच विधानावरून त्यांच्यावर टोला लगावला आहे.
पाटील यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Election) आधी भाजप (BJP) कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. यावेळेस त्यांनी मोदींचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले होते, पंतप्रधान प्रत्येक मिनिटाला देशासाठी काम करतात. 24 तास जागे राहून देशासाठी काम करता यावे यासाठी मोदी झोप कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या ते फक्त 2 तासच झोपतात. मोदी कामाचा एक मिनिटही वाया घालवत नाहीत.
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या या विधानाचा संदर्भ घेऊन संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यांच्यावर आणि भाजपावर बोचरी टीका केली आहे. “महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांनी आता कडेलोट केला आहे. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत सांगितलं नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात आणि फक्त दोनच तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधानं ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना इतकं मानसिक बळ येतं कुठून? हा संशोधनाचा विषय आहे”, असा टोला राऊत यांनी लगावला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.