शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे सह इतर 40 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल

सुरतच्या हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आता आसामच्या गुवाहाटीमधील रॅडिसन हॉटेलवर पोहोचले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeANI
Published on
Updated on

महाराष्ट्रात सध्या राजकीय पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सुरतच्या हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदार आता आसामच्या गुवाहाटीमधील रॅडिसन हॉटेलवर पोहोचले आहेत. सायंकाळी उशिरा शिवसेनेच्या दोन नेत्यांनी सुरतमध्ये शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा देखील प्रयत्न केला. (Shiv Sena Eknath Shinde along with 40 other MLAs filed in Guwahati)

Eknath Shinde
मुंबई-गोवा महामार्ग बनला चिखलमय; अपघात होण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली आहे. हा संवाद सुमारे 10 मिनिटे चालला होता. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशीही शिंदे यांची चर्चा झाली आहे.

पक्षाच्या भल्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. आजपर्यंत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी केलेली नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना विचार करून परत येण्यास यावेळी सांगितले आहे. या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये.

गुवाहाटी विमानतळावरून निघताना एकनाथ शिंदे यांनी आम्ही अध्याप शिवसेना सोडली नाही, बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेणार असल्याचे म्हटले आहे. तर एक आमदार अब्दुल सत्तार यांनी विनोदी स्वरात सांगितले की, आम्ही सर्व बिर्याणी खायला आलो आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराजे यावेळी जय महाराष्ट्र म्हटले.

Eknath Shinde
''...तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता''

एकनाथ शिंदे आपल्या आमदारांची नेमकी संख्या असलेले पत्र राज्यपालांना सुपूर्द करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा देखील शिंदे यांनी दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com