''...तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता''

मराठी बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांचे वक्तव्य
Abhijit Bichukale
Abhijit BichukaleDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात गेल्या काही तासांपासून नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडीत शिवसेनाला मोठ खिंडार पडले आहे. त्यामूळे महाविकास आघाडीचे सरकार यापूढे ही टीकणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. असे असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यादिशेने या साऱ्या घडामोडींचा मार्ग जात असल्याने एकनाथ शिंदे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना मराठी बिग बॉस' फेम आणि सध्या राष्ट्रपती पदासाठी इच्छूक असलेले अभिजीत बिचुकले यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Big Boss Marathi Fame Abhijeet Bichukle Reacted to ShivSena Leader Eknath Shinde )

Abhijit Bichukale
एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेते पदावरून हकालपट्टी

अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया देताना बिचुकले यांनी त्यांच्या शब्दांत शिंदेंना कडवे बोल सुनावले अभिजीत बिचुकले म्हणाले, की "आज जी परिस्थिती आहे, यावेळी जर बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, . तसेच उद्धव ठाकरे या संकटातून बाहेर पडतील आणि मुख्यमंत्री तेच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

राज्यातील स्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती पण ती दुसऱ्या कामासाठी झाली. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आमदारांची मते फुटली, काँग्रेसची काही मते कमी झाली, शिवसेनेची मते कमी झाली. हे गुप्त मतदान होते. त्यामुळे मते फुटली तरीही हे दोन्ही पक्ष आपले आमदार एकसंघ ठेवतील असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com