सध्या महाराष्ट्राच्या धर्तीवर बिहारमध्ये ही सत्तांतरण झाले आहे. भाजपने महाराष्ट्रात छातीठोकपणे आपले वर्चस्व सिद्घ केले असले तरी, बिहारमध्ये भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याचं चित्र आहे.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी निर्णायक भुमिका घेत भाजसोबतच्या युतीला रामराम ठोकला. आणि भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला गेला. याबाबत बोलताना बिहारचे भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमारांना इशारा देताना महाराष्ट्रातील शिवसेना का फूटली याचा ही खुलासा केला आहे.
बिहारमध्ये नितीशकुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला आहे. यावेळी भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आपण महाराष्ट्रात शिवसेना का फो़डली हे सांगत नितीश कुमार यांना इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रात शिवसेनेने अशाच प्रकारे जनतेचा विश्वासघात केला आहे. म्हणून आज शिवसेनेवर ही वेळ आली आहे.
नितीश कुमार यांना इशारा देत त्यांनी बिहारमध्ये ही भविष्यात महाराष्ट्राप्रमाणे यांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल आणि जनतेने दिलेला कौल आहे त्याप्रमाणे सत्ता प्रस्तापित होईल, आम्ही 74 जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. मात्र हे अधिक काळ चालणार नाही असं ही ते म्हणाले.