राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांकडून हल्ला

सोमय्या यांच्या गाडीच्या काचा फोडल्यामुळे त्यांना हनुवटीवर जखम झाल्याचे कळत आहे.
Kirit Somaiya Attack
Kirit Somaiya AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Kirit Somaiya Attack : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा आणि नमाज पठणाच्या भोंग्यावरून वादविवाद सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांविरोधात बंड करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना काही वेळापूर्वी खार पोलिसांनी 153 अ या कलमाखाली ताब्यात घेतले. सध्या सुरू असलेल्या प्रकरणामध्ये आक्रमक वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Shiv Sainiks attack Kirit Somaiya who went to meet Rana couple at khar police station)

दरम्यान, राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेले भाजपचे किरीट सोमय्या यांच्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. सोमय्या यांच्या गाडीच्या काचा फोडल्यामुळे त्यांना हनुवटीवर जखम झाल्याचे कळत आहे. या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी झाले असून त्यांनी या भ्याड हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

या संदर्भात शिवसैनिकांचे म्हणणे असे आहे की, 'आम्ही सोमय्यांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नसून सोमय्यांच्या ड्रायव्हरने आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही आमच्या बचावाखातर त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.'

हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या किरीट सोमय्या यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून खार पोलीस अधिकारी आणि हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर निषेध व्यक्त करत त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत आपला निषेध दर्शवला आहे.

या सर्व प्रकरणांमुळे आधीच शिगेला पोहोचलेल्या वादाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com