शरद पवारांची रोहित पवारांवर स्तुतीसुमने म्हणाले...

...त्यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार
NCP Leader
NCP Leader Dainik Gomantak
Published on
Updated on

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात शरद पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड भागात विकास कामांमध्ये आहिल्याबाईंच्या दृष्टीकोन दिसतो. असं ही ते यावेळी म्हणाले. ( Sharad Pawar's praise for Rohit Pawar said ... )

अहिल्यादेवी होळकरांचे काम सर्वसमावेशक होतं. त्यांचा समाजासाठीचा दुरदृष्टीकोन आज ही आपल्याला जाणवतो असं ते म्हणाले. कितीही संकट आली तरी त्याचा सामना केला पाहिजे आणि राज्यकारभार केला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्त्री वर्गाचा सन्मान करणं. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांचा अधिकार वाढवण्यासाठी आहे, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज्याचा विकास करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरचेचे आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ही उपस्थित होते.

NCP Leader
महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ल्याला 'सापांचा किल्ला' का म्हणतात?

याशिवाय, त्यांनी कर्जत- जामखेड येथील पाण्याच्या प्रश्नावरही भाष्य केलं. कर्जत- जामखेड महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील पाण्याचा प्रश्न सुटला नाही. असे ही त्यांनी नमुद केले. आज अहमदनगरच्या चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळं राडा पाहायला मिळाला. चौंडीत जाण्यापासून पडळकर आणि खोत यांना रोखल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com