पंतप्रधानांना भेटल्यावर एक मंत्री आत जातो, आरोपावर पवारांचं थेट भाष्य

देशात आजकाल मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांच उल्लंघन होत आहे: शरद पवार
Sharad Pawar
Sharad Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुडी पाढव्याच्या दिवशी झालेला सभेनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. सभेनंतर अनेक नेत्यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्या टीकेचे उत्तर देण्यासाठी ठाकरे यांनी परत मंगळवारी ठाण्यात 'उत्तर सभा' घेतली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे यांचा समाचार घेण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज यांचे सर्व आरोप खोडून काढले.

Sharad Pawar
INS Vikrant Case: किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

"शरद पवार पंतप्रधानांना भेटले की एक मंत्री आत जातो", या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर तुमची काय प्रतिक्रिया, असे विचारले असता पवार म्हणाले, "मी खासदार आहे. एक खासदार जनतेचे प्रश्न घेऊन पंतप्रधान किंवा इतर मंत्र्यांना भेटू शकत नाही का? यात काय चुकीचे आहे?" ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) यांनी दोन वर्षांपासून विधान परिषदेवरील आमदारांची नियुक्ती थांबवून ठेवली आहे. याबाबबत पंतप्रधानांशी चर्चा करायची नाही तर कुणाशी करायची?"

Sharad Pawar
''राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबाचं लिखाण वाचावं''; शरद पवारांची बोचरी टीका

शरद पवार पुढे म्हणाले, ''देशात आजकाल मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांच उल्लंघन होत चाललं आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची काही एक गरज नाही. राज ठाकरे काल बोलले की, मी फुले, शाहू, आंबेडकर यांचंच नाव घेतो हे खरं नाही. महाराजांच्या आदर्शाचा पायीक होऊन आपल्या हातातील सत्तेचा कशाप्रकारे वापर करायचा हे आपण ठरवले पाहिजे. मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. आज खऱ्या अर्थाने महागाईचा प्रश्न आहे. मात्र राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काल जनतेच्या प्रश्नांना पूर्णपणे बगलं दिली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com