देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा वेगळ्याच वळणावर चाललं आहे. याच पाश्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी प्रदिर्घ चर्चा केली. दरम्यान ते आता पत्रकार परिषद घेऊन मोठा कोणता खुलासा करणार, तसेच त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली याचा कयास लावला जात होता. (Uddhav Thackeray criticized BJP on the politics of the country)
के. सी. राव म्हणाले, ''आमची आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. देशातील राजकारण मागील काही दिवासांपसून कोणत्या दिशेने चालले आहे, त्याकडेही आम्ही लक्ष वेधले आहे. दोन्ही राज्यातील संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नही करणार आहोत. देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी हैद्राबादमध्ये आम्ही सर्वजण भेटणार आहोत. देशातील राजकारणात पुन्हा नवा उष:काल करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा हा यशस्वी होतोच. आज खऱ्या अर्थाने नवी सुरुवात झाली आहे. येत्या काळात आम्ही आमचा कार्यक्रमही देणार आहोत.''
त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, ''मागील काही दिवसांपासून आमच्या भेटीचा कार्यक्रम ठरत होता. मात्र त्यावर अमंलबाजवणी होत नव्हती. आज मात्र हा योगायोग जुळून आला आहे. देशात सुरु झालेले सूडाचे राजकारण आम्ही कदापि खपवून घेणार नाही. देशाच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्या-राज्यामधील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समस्या समजून घेऊन पुढे जाण्यासंबंधी चर्चा झाली आहे. या भेटीच्या माध्यमातून आम्ही देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.