पुण्यात नातेसंबंधांवर भारी पडले वासनाकांड

बाप आणि भावाने 5 वर्षांपासून केला बलात्कार, आजोबा आणि नातेवाईकांनी केला विनयभंग
Pune Crime News
Pune Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहिती नूसार, एका अल्पवयीन मुलीवर तिच्या किशोरवयीन भावाने आणि वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. (sexual assualt by parents for 5 years in pune)

Pune Crime News
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर तो सुपर होईल!

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हे गेल्या पाच वर्षात घडले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बलात्कार आणि विनयभंगासाठी भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ते पूढे म्हणाले की, पुणे (Pune) शहरातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिचा भाऊ आणि वडिलांवर कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर पीडितेचे नातेवाईक आणि तिच्या आजोबांवर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना उघडकीस कशी आली?

अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय मुळचे बिहारचे रहिवासी आहेत. ते सध्या पुण्यात राहतात. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते म्हणाल्या, "मुलीने तिच्या शाळेत 'गुड टच आणि बॅड टच' सत्रादरम्यान तिचे अनुभव सांगीतले तेव्हा ही घटना उघडकीस आली. गेली पाच वर्षे ती या सगळ्याचा सामना करत होती. तक्रारीचा संदर्भ देत सातपुते म्हणाले की, वडिलांनी 2017 मध्ये आपल्या मुलीचा लैंगिक छळ सुरू केला होता या दरम्यान ते दोघे बिहारमध्ये राहत होते. 'मुलीच्या मोठ्या भावाने नोव्हेंबर 2020 च्या सुमारास तिचा लैंगिक छळ सुरू केला. तिचे आजोबा आणि दूरचे नातेवाईक तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचे. सातपुते म्हणाले की, सर्व घटना वेगवेगळ्या वेळी घडल्या असल्याने आणि आरोपींना एकमेकांच्या हालचालींची माहिती नसल्याने हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण म्हणता येणार नाही. या प्रकरणात मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याची कलमेही जोडली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com