महाराष्ट्रात ओमायक्रॉनमुळे टेन्शन वाढले, सात जणांना लागण

यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण झालेले आढळून आले आहे.
Corona
CoronaDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच आता कोरोनाच्या ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण झालेले आढळून आले आहे. हे प्रवाशी नायजेरियामधून आले होते.कर्नाटक (Karnataka) आणि गुजरातनंतर (Gujarat) आता कोरोनाचे (Corona) नवीन ओमायक्रॉन प्रकार महाराष्ट्र आणि दिल्लीतही (Delhi) पाय पसरले आहेत. आज दिल्लीमध्ये ओमायक्रॉन प्रकाराची लागण झालेली व्यक्ती आढळली. अशा प्रकारे, देशभरात ओमायक्रॉनच्या पाच प्रकरणांची पुष्टी झाली आहे. याआधी शनिवारी मुंबईजवळील डोंबिवलीतील एका 33 वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले होते. तो केपटाऊनहून दुबईमार्गे दिल्लीत आला आणि नंतर दिल्लीहून मुंबईला आला. 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत आल्यानंतर तो डोंबिवली येथील आपल्या घरी गेला.

Corona
ओमायक्रॉनची महाराष्ट्रात एन्ट्री!

दरम्यान, 24 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवलीमधील तरुणाला सौम्य तापाची लक्षणे जाणवली होती. त्याच्यावर कल्याण डोंबिवलीमधील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 24 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे हा तरुण मुंबईमध्ये दाखल झाला होता. दरम्यान या तरुणामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे आढळून आली होती. या नव्या विषाणू व्हेरिएंटचा राज्यातील हा पहिलाच रुग्ण आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पासून 50 किमी अंतरावर असलेल्या कल्याणमधील कोविड-19 केअर सेंटरमध्ये रुग्णावर (Patient) उपचार केले जात आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (Municipal corporation) महामारी कक्षाच्या प्रमुख डॉ प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की, विविध देशांतून कल्याण-डोंबिवली परिसरात प्रवास केलेल्या इतर सहा जणांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कर्नाटक (Karnataka) आणि गुजरातनंतर (Gujarat) आता कोरोनाचे (Corona) नवीन ओमायक्रॉन प्रकार महाराष्ट्र आणि दिल्लीतही (Delhi) पाय पसरले आहेत. आज दिल्लीमध्ये ओमायक्रॉन प्रकाराची लागण झालेली व्यक्ती आढळली. अशा प्रकारे, देशभरात ओमायक्रॉनच्या पाच प्रकरणांची पुष्टी झाली आहे. याआधी शनिवारी मुंबईजवळील डोंबिवलीतील एका 33 वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले होते. तो केपटाऊनहून दुबईमार्गे दिल्लीत आला आणि नंतर दिल्लीहून मुंबईला आला. 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत आल्यानंतर तो डोंबिवली येथील आपल्या घरी गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com