'गोव्यात आघाडी करताना शंभरदा विचार करु': संजय राऊत

महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोव्याचं एक वेगळे नातं असल्याची आठवणही यावेळी राऊत यांनी करुन दिली.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू लागला आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) राजकीय पक्षांनी आघाडी करत निवडणूकपूर्व आपली ताकद दाखविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने नव्यानेच गोव्यात प्रवेश केलेल्या तृणमुल पक्षाबरोबर युती केली आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डने (Goa Forward) युती केली होती. या पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना, 'तृणमुल कॉंग्रेसवर (Trinamool Congress) निशाणा साधला. गोव्यातील लोकांची मानसिकता वेगळी आहे. त्याचबरोबर गोव्यात पहिल्यांदाच तृणमुल कॉंग्रेस विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचे आम्ही गोव्यात स्वागत करतो. मात्र त्यांनी राज्यातील समस्यांकडे लक्ष द्यावे.' तसेच महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोव्याचं एक वेगळे नातं असल्याची आठवणही यावेळी राऊत यांनी करुन दिली.

राऊत पुढे म्हणाले, ''आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत एकवेळ स्वतंत्रपणे लढू परंतु कोणत्या आघाडीत जाणार नाही. राहीला प्रश्न यूपीएमध्ये सामील होण्याचा तर याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील.''

Sanjay Raut
गोवा भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची पहिली बैठक संपन्न

दरम्यान, तृणमुल कॉंग्रेस आणि महाराष्ट्र वादी गोमन्तक पक्षाने सोमवारी, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. एमजीपीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मोठ्या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, 'आम्ही दोन्ही पक्षांनी गोव्यतील जनतेला पारदर्शी सुशासन देण्यासाठी एकत्र येत आघाडी केली आहे. गोव्यात मोठ्याप्रमाणात भाजपच्या विरोधात लाट आहे. लोकांना राज्यात बदल हवा आहे, आणि आगामी काळात सरकार स्थापन करु ."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com