'केंद्रीय यंत्रणांचा खुळखुळा झालायं'

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत असतानाच दुसरीकडे आजपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रेस सुरुवात होत आहे.
Sanjay Raut News, Sanjay Raut on Central Govt News,
Sanjay Raut News, Sanjay Raut on Central Govt News, Dainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत असतानाच दुसरीकडे आजपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रेस सुरुवात होत आहे. त्यामुळे मुंबई, मराठवाडा आणि विदर्भातील खासदार या शिवसंवाद यात्रेमध्ये सहभाग घेणार आहेत. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागपूरमध्ये बोलत आहेत. (Sanjay Raut has criticized the Central Investigation Agency)

दरम्यान, शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना नेते, पदाधिकारी यांनी मराठवाडा, विदर्भातील जनतेशी, पत्रकारांशी संवाद साधतील हाच आमच्या शिवसंवाद यात्रेचा उद्देश असल्याचे शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात शिवसेना (Shiv Sena) पक्ष संघटनेच्या जोरावर सक्रीयपणे उभा आहे. शिवसेनेच्या विरोधातील समज, गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असेही राऊतांनी यांनी म्हटले. (Sanjay Raut News)

Sanjay Raut News, Sanjay Raut on Central Govt News,
AIMIM बरोबर युती करण्याबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

संजय राऊत म्हणाले, 'भावना गवळी यांनी हजर न राहण्याची रितसर परवानगी घेतली आहे. केंद्र सरकारने (Central Government) गवळी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. खऱ्या अर्थाने केंद्रीय यंत्रणांचा खुळखुळा झालायं. केंद्रीय यंत्रणांनी सर्वाधिक कारवाया पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्रात केल्या आहेत. या तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार आपल्या स्वार्थासाठी करत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना टार्गेट करत आहे. महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकणार नाही. तसेच दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम बांधवांसाठी एक वेगळी शाखा निर्माण केली मग त्यांना आपण गैर ठरवणार का? देशात अनेक राज्यपाल आहेत ज्यांची भाजपने नियुक्ती केली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com