पुणे : रोजच्या हटके बातम्या आणि चालू घडामोडींविषयी असलेल्या ‘सकाळ’च्या ‘पॉडकास्ट’ला देशातील टॉप 10 मध्ये येण्याचा मान मिळाला असून, श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच हे साध्य होऊ शकले. यामध्ये ‘सकाळ’च्या पॉडकास्टला पाचवा क्रमांक मिळाला आहे. मराठी माध्यमातील पॉडकास्टचा हा प्रयोग वर्षभरातच श्रोत्यांच्या पसंतीला उतरला आहे. याआधी स्थानिक भाषेतील बातम्यांचे पॉडकास्ट म्हणून लोकप्रिय होण्याचा मानही ‘सकाळ’ने मिळवला आहे.
पॉडकास्टमध्ये नेमकं काय?
श्रोत्यांना ‘सकाळ’च्या ‘पॉडकास्ट’मध्ये विश्वसनीय बातम्या ऐकण्याबरोबरच हवामानाचे अपडेट, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी ते राज्यातील मोठ्या घडामोडी सविस्तर ऐकण्यास मिळतात. याबरोबरच देशातील आणि राज्यातील सर्वांत चर्चेत असलेली बातमीदेखील यामध्ये सांगितली जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने येणारे निर्णय, परीक्षांचं वेळापत्रक, निकालाच्या तारखा ते नोकरीच्या संधी, गृहिणींशी संबंधित किचन ते आरोग्य अशा सर्व विषयांचा समावेश या पॉडकास्टमध्ये केला जातो.
‘अनप्लग सेलिब्रिटी टॉक शो’
‘पॉडकास्ट’मध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजेच दर शनिवारी ‘अनप्लग सेलिब्रेटी टॉक शो’मध्ये मराठी आणि हिंदीतील सेलिब्रेटींशी मनमोकळ्या गप्पांचा फड रंगवला जातो. आतापर्यंत या सेलिब्रेटी टॉक शोमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद, मधुराणी गोखले, ‘शेर शिवराज’मधील अभिनेता चिन्मय मांडलेकर आदींनी सहभाग घेतला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.