Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य गोळीबारात ठार

Powai Child Kidnapping : मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. घटनेची माहिती मिळताच त्यांचे पालकही आले.
Powai Mumbai Hostage Case
Rohit AryaDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना गुरुवारी (३० ऑक्टोबर) उघडकीस आली. याप्रकरणात मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि जवानांनी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

रोहित आर्यने आरए स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. तेथे अॅक्टिंगचे क्लासेस घेतले जातात. मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. घटनेची माहिती मिळताच त्यांचे पालकही आले. सुमारे १०० मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि विशेष कमांडोंनी कारवाई केली.

Powai Mumbai Hostage Case
'धार्मिक संघटनेकडून त्रास, आर्थिक संकट, बायका पोरांचा सांभाळ करणं शक्य होत नाही'; व्हिडिओ रेकॉर्ड करुन सिंधुदुर्गात मुस्लिम युवकाने संपवले जीवन

संशयिताला अटक करुन मुलांची सुटका करण्यात आली. रोहित आर्य मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, मुलांना ओलीस ठेवून स्वतःच्या मागण्यांसाठी दबाव आणणाऱ्या संशयिताचे नाव रोहित आर्य असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहितला गोळी लागली यातचा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एका योजनेसाठी आर्य काम करत होता पण, त्याचा पैसा त्याला मिळाला नव्हाता, असा आरोप त्याने केला होता. दरम्यान, पोलिसांनी आर्यने ओलिस ठेवलेल्या मुलांना सुखरुप बाहेर काढले आहे.

याचवेळी झालेल्या झटापटीत रोहितला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. यातच नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. मुलांना ओलिस ठेवल्यानंतर त्याने एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com