Ratnagiri: खाली उतरताना घसरला पाय, प्रवासी थेट ट्रेनखाली गेला; रेल्वे पोलिसांमुळे बचावला जीव Video

Ratnagiri Railway Station Video: स्थानकावर हजर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
Ratnagiri train accident video
Passenger slips under train RatnagiriDainik Gomantak
Published on
Updated on

ट्रेनमधून उतरताना पाय घसरला आणि प्रवासी थेट ट्रेनखाली आला. दरम्यान, यावेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले यामुळे त्याचा जीव बचावला. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर शनिवारी (३० ऑगस्ट) ही घटना घडली.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, मुंबई ते हातिया दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक ०११६७ ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्थानकावर थांबा घेऊन जात असताना एका प्रवाशाना घाईत धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानकावर हजर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Ratnagiri train accident video
Trump Is Dead! सोशल मिडिया एक्सवर का होतंय व्हायरल?

स्थानकावर उपस्थित एका विक्रेत्यांने देखील यावेळी मदत केली. अखेर प्रयत्नानंतर प्रवाशाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. सुरक्षा दलाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीवर खूश होत कोकण रेल्वेच्या चेअरमन संतोष कुमार झा यांच्याकडून कॉन्स्टेबल रणजीत सिंग, महेंद्र पाल आणि विक्रेता वीर सिंग यांना प्रत्येकी ५,००० रुपये बक्षीस देण्यात आली. दरम्यान, प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उतरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com