Trump Is Dead! सोशल मिडिया एक्सवर का होतंय व्हायरल?

Social Media X Viral Trend: सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सध्या 'जर ट्रम्प यांचा मृत्यू झाला', असा हॅशटॅग व्हायरल होत आहे.
Social Media Viral Trend | Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यू संबधित एक ट्रेंड सोशल मिडिया 'एक्स'वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. Trump Is Dead! हा ट्रेंड वापरुन आत्तापर्यंत जवळपास ७० हजार पोस्ट एक्सवर करण्यात आल्या आहेत. एक्सवर सध्या वाऱ्यासारखा हा हॅशटॅग व्हायरल होत आहे.

'डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झाला असेल तर मी त्या ५०० डॉलर भेट देऊन मात्र त्याला ही पोस्ट लाईक आणि पुन्हा पोस्ट करावी लागेल,' अशा आशयाची पोस्ट केली या पोस्टला जवळपास आठशे लोकांनी लाईक केले असून, जवळपास तीन लाख नेटकऱ्यांपर्यंत ही पोस्ट पोहोचली आहे.

Social Media Viral Trend | Donald Trump
Jammu Kashmir Landslide: जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये भूस्खलन, 7 जणांचा मृत्यू, अनेक घरं गेली वाहून Watch Video

डोनाल्ड ट्रम्प गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आलेले नाहीत, तसेच, ३० आणि ३१ ऑगस्टपर्यंत त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, त्यांच्या तब्येतीबाबत देखील काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांमुळे चुकीची माहिती सोशल मिडियावर पसरवली जात आहे.

ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत सोशल मिडियावर पसरवल्या जात असलेल्या माहितीमुळे ट्रम्पयांच्याबाबतचा ट्रेंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी थेट त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करत गैरसमज पसरवला जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांची तब्येत उत्तम असल्याचे त्यांच्या संबधित जवळच्या अधिकाऱ्याने इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

ट्रम्प यांच्याबाबत व्हायरल होत असलेल्या ट्रेंडबाबत उप राष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या वक्तव्याचा देखील संदर्भ दिला जात आहे. जे. डी यांनी ट्रेजेडीचा उल्लेख केला होता. याचा संदर्भ जेखील ट्रम्प यांच्या मृत्यूशी जोडला जात आहे. दरम्यान, त्यात काही तथ्य नसल्याचे देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे.

Social Media Viral Trend | Donald Trump
Shaheen Afridi Record: बुमराहला पछाडलं! शाहीन आफ्रिदी बनला T20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका लादत असलेल्या टॅरिफची चर्चा सर्वत्र केली जात आहे. ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यावरुन देखील नागरिकांनी सोशल मिडियावर मीम्स पोस्ट केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com