Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Ratnagiri Ganpatipule beach 1 tourist death: प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतील तरुणांच्या गटावर शुक्रवारचा दिवस दुर्दैवी ठरला.
Ratnagiri
RatnagiriDainik Gomantak
Published on
Updated on

गणपतीपुळे : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतील तरुणांच्या गटावर शुक्रवारचा (ता.७) दिवस दुर्दैवी ठरला. समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी तिघे खोल पाण्यात गेल्याने बुडाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, दोघांना स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. ही घटना शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

मृत तरुणाचे नाव प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय २६, रा. मानखुर्द, मुंबई) असे असून, त्याच्यासोबत असलेले भीमराज आगाळे (२४, रा. कल्याण, मुंबई) आणि विवेक शेलार (२५, रा. विद्याविहार, मुंबई) या दोघांना स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक, जीवरक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात आले.

Ratnagiri
7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाच मित्र आदर्श धनगर (रा. गोवंडी), प्रफुल्ल त्रिमुखी (रा. मानखुर्द), सिद्धेश काजवे (रा. परेल-लालबाग), भीमराज आगाळे (रा. कल्याण) आणि विवेक शेलार (रा. विद्याविहार) हे देवदर्शन आणि पर्यटनाच्या उद्देशाने शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे येथे आले होते. त्यांनी एका खासगी लॉजमध्ये मुक्काम केला होता. दुपारनंतर सर्वजण समुद्रस्नानासाठी समुद्रात उतरले.

सायंकाळच्या सुमारास प्रफुल्ल, भीमराज आणि विवेक यांनी समुद्राच्या अधिक खोल भागात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लाटांचा जोर आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले.

त्यांच्या अन्य मित्रांनी आरडाओरडा केल्यावर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी तत्काळ समुद्रात उडी घेऊन बचावकार्य सुरू केले. काही वेळात तिन्ही तरुणांना बाहेर काढण्यात यश आले.

Ratnagiri
Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

त्यानंतर गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रफुल्ल त्रिमुखी याला मृत घोषित केले, तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दोघांची प्रकृती सुधारत असून, पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com