'राज्यपालांना महापुरुषांच्या कार्याची समज नाही'

शिवाजी महाराज, रामदास स्वामी कोण आहेत हे राज्यपालांना माहिती नाही.

Raj Thackeray
Raj ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (Maharashtra Navnirman Sena) 16 वा वर्धापन दिन आहे. मनसेची स्थापना होऊन आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. महानगर पालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राज ठाकरे मन सैनिकांना कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच मागील काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या प्रकरणावर महाराष्ट्रातील राजकारण चांगलचं गाजत आहे. यावरही राज ठाकरे काय बोलणार याकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणुका फक्त लढवायच्या नाही तर जिकांयच्या आहेत, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केले. (Raj Thackeray criticized Governor Bhagat Singh Koshyari)

राज ठाकरे म्हणाले, ''दोन वर्ष मी कुठेही भाषण केले नाही. मुलाखती दिल्या मात्र भाषण केलं नाही. सर्व मन सैवनिकांना माझ्याकडून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. राज्यात सगळीकडे शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. या शांततेच्या वातावरणात मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत आहेत. कोरोना काळात कुटुंबे जवळ आली, एकमेकांची विचारपूस करु लागली हा एक आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. येणाऱ्या काळात आणखी जोमाने कोरोना संकटाचा सामना करायचं आहे. संकटाच्या काळात घाबरुन न जाता आपण जोमाने उभे राहीले पाहिजे. कोरोना काळात तुम्ही माझी साथ सोडली नाही, यासाठी मी तुमचा आभार आहे.''


Raj Thackeray
पुण्यात जल्लोशात साजरा होणार मनसेचा 16वा वर्धापन दिन

ठाकरे पुढे म्हणाले, ''लॉकडाऊनमधील शांतता भितीदायक होती. कोरोना सारख्या संकटाला आपण सर्वजण सामोरे गेलो. लतादिदींनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट केले. दुसरीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची केवळ जात पाहून लोकांनी त्यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष तुम्हाला जातीत अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे लाजीरवाणं होतं. शिवाजी महाराज, रामदास स्वामी कोण आहेत हे राज्यपालांना माहीती नाही. राज्यपालांना या महापुरुषांबद्दल काय माहिती आहे. आपल्याला ज्यामधलं कळत नाही त्याबद्दलही राज्यपाल बोलत सुटले आहेत.''

शिवाय ते पुढे म्हणाले, ''निवडणुका जेव्हा येतात तेव्हा वातावरण त्याचे रंग दिसायला लागतात. जनतेसाठीच फक्त निवडणुका आहेत. राज्यात जे काही राजकारण सुरु आहे, ते तुम्हा आम्हाला नवं नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com