आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) 16 वा वर्धापन दिन आहे. आज मनसेची स्थापना होऊन 15 वर्ष पूर्ण झाली. 2006 ला मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. दरम्यान, यावेळी होणारा वर्धापन दिनाचा मेळावा विशेष खुप असणार आहे. याचं कारण म्हणजे दरवेळी मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होणार आहे. त्यामुळे पुण्यातल्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे. (MNS going to celebrate its 16th anniversary in Pune today)
दरम्यान, पुढच्या काही दिवसात महानगर पालिका निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण, सर्वच पक्षांनी पालिकेच्या निवडणुकांच्या तयारी सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देणार आहेत का? हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त आज होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात केली. मुंबई बाहेर प्रथमच पुण्यात वर्धापन दिन होत असल्याने या मेळाव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागातून मनसेसैनिक पुण्यात येणार आहेत. या मेळाव्याच्या ठिकाणी 4 वाजल्यापासून मनसेसैनिक येणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्याठिकणी येणार्या महिला पांढरा फेटा घालणार आहेत, तर महिला भगव्या साड्यापरिधान करणार आहेत.
हा मुंबईच्या बाहेर पहिलाच मेळावा असणार आहे. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व जय्यत तयारी केली असल्याची माहिती मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली आहे. कोरोना काळातानंतर (Covid-19) मनसेचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. या मेळाव्यासाठी पुण्याच्या बाहेरुन मुबंई, सातारा, सांगली, धुळे, जळगाव औरंगाबाद यासह महाराष्ट्रातून कार्यकर्ते पुण्यात सभेसाठी सहभागी होणार आहेत. साधारणत 8 ते 10 हजार मनसेसैनिक पुण्यात येणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे.
दरम्यान, 9 मार्च 2006 रोजी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली. आत्तापर्यंतच्या वाटचालीत मनसेनं अनेक चढउतार पाहिले आहेत.
पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर मात्र मनसेला असं यश मिळालेल नाही. सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये करता आले नाहीय. मनसेचं प्रभावक्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकपलीकडे विस्तारलेल नाहीये. त्यामुळे पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाच लक्ष लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.