मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सक्रिय झाले आहे. हवामान खात्याकडून मुंबईत (Mumbai) जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कालपासून मुंबईत (Mumbai) पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच मुसळधार पाऊस सुरू असून काही वेळच्या अंतराने पाऊस कोसळत आहे. परंतु आज मुंबई शहरसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान (Weather) खात्याने दर्शवली आहे.
मुंबईत पुढील दोन दिवस एल्लो अलर्ट (Yellow alert) दिला आहे. तसेच आज मुंबई (Mumbai) शहरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता दर्शवली आहे. पुणे, सांगली,कोल्हापूर तसेच कोकणातील पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु गुरुवारी आलेल्या पुरामुळे येथील अडचणी अजून देखील कायम आहेत. तसेच चिपळूणमधील पुरात (Flood) अडकलेल्या लोकांसाठी बचाव मोहीम सुरू आहे.
खडकवासला या धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला होता. रात्रीच्या सुमारास 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्या गेले होते. पाण्याचा फोर्स खूप असल्याने शिवणे आणि भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केले होते. आज सकाळपासून पाणी सोडण्याचा फोर्स कमी केला आहे. तसेच या धरणामधून 9339 क्यूसेक्स एवढ्या जोराने पाण्याचा विसर्ग सुरू असून या भागात मुसळधार पाऊस देखील सुरू आहे.
* रेल्वे बंद झाल्याने लालपरीकडून प्रवाशांना मदतीचा हात
मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांन अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यामुळे लालपरी प्रवाशांच्या मदतीला समोर आली आहे. पुणे शहरातून मुंबईत जाण्यासाठी 60 अधिक बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काल पुणे, पिंपरी चिंचवड व स्वारगेट डेपोमधून मुंबईकरीता 60 बस सोडण्यात आल्या . तसेच पुणे शहरातून कोकोणच्या मार्गाने जाणाऱ्या सगळ्या बस रद्द केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.