Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रस्ते पाण्याखाली, नागरिकांच्या घरातही शिरले पाणी

Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रस्ते पाण्याखाली, नागरिकांच्या घरातही शिरले पाणी
Published on
Updated on

पुण्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain In Pune) धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून, अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे.

Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रस्ते पाण्याखाली, नागरिकांच्या घरातही शिरले पाणी
Bicholim Rain: डिचोलीत पावसाचा कहर सुरूच

धनकवडी (Dhankawadi) भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले असून यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, सोसायटीत राहणारे अनिल पावसकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दारातच हे भले मोठे झाठ कोसळल्याने ते घराबाहेर येऊ शकत नाहीत. अग्निशमन दलाने झाड हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. कोथरूडमध्ये (Kothrud) देखील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे.

मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी. टी. ईवडे रोड,कात्रज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलंय. शिवाय शहरात सहा ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रस्ते पाण्याखाली, नागरिकांच्या घरातही शिरले पाणी
Xi Jinping दोन वर्षांनंतर परदेश दौऱ्यावर, Vladimir Putin यांना भेटणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com