Bicholim  Rain
Bicholim Rain Dainik Gomantak

Bicholim Rain: डिचोलीत पावसाचा कहर सुरूच

नद्यांच्या पातळीत वाढ; पाणी बाहेर फुटण्याची शक्यता

डिचोली: डिचोलीत गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच असून आज रविवार 11 सप्टेंबर रोजी देखील डिचोलीत सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. सकाळी पावसाचा जोर होता. दिवसभर आकाशात काळेकुट्ट ढगही दाटून आले होते. सलग सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम जाणवत आहे.

(heavy rain reported in Bicholim )

Bicholim  Rain
MORJIM BEACH: गोव्यात पर्यटकांची हूल्लडबाजी सुरुच

चतुर्थी सणात विश्रांती घेतल्यानंतर गेल्या मंगळवारपासून पावसाची बरसात सुरू झाली आहे. अधूनमधून जोरदार पर्जन्यवृष्टीही होत आहे. सलग सहा दिवस पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून डिचोलीसह साखळीतील वाळवंटी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा तडाखा चालूच राहिल्यास नद्यांचे पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Bicholim  Rain
Goa Mine: राज्यातील बंद खाणी त्वरित सुरू कराव्या - मंत्री सुभाष फळदेसाई

दरम्यान, पावसाचा कहर सुरु असला, तरी किरकोळ अपवाद वगळता पावसामुळे मोठी वित्तहानी किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. असे असले तरी हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजावरुन येत्या तीन दिवसात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने डिचोलीसह राज्यातील नागरिकांना बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेतच आपले नियोजन आखावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com