Raigad Boat Capsizes: रायगड समुद्रात बोड बुडाली; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Boat Capsized In Raigad Sea: रायगड समुद्रात सकाळी साडे नऊच्या सुमारास बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे.
Raigad boat capsized news
Boat CapsizedFile Photo
Published on
Updated on

रायगड: रायगड समुद्रात बोड बुडाल्याची घटना उडकीस आली आहे. बचाव पथकाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी (२१ ऑगस्ट) सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या बोटमध्ये किती लोक होते? ही घटना कशी घडली? याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या उरण भागात बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. गुजरातच्या हद्दीतील ही मासेमारी बोट असल्याचे सांगितले जाते. बोट बुडाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि कोकण भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे समुद्राला देखील उधाण आहे. गुरुवारी सकाळी उरण भागात मासेमारी करणारी बोट बुडाली. या बोटीत मासेमारी करणारे सात मच्छिमार असल्याची माहिती मिळाली असून, त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com