'दारू सोडा, मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळवा', व्यसन सोडण्यासाठी विरोधात महाराष्ट्रात अनोखी मोहीम

महाराष्ट्रातील एका पंचायतीने लोकांचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू राबवला आहे
Quit Liquor Get Scholarship for Kids
Quit Liquor Get Scholarship for KidsDainik Gomantak

Independence Day: महाराष्ट्रातील एका पंचायतीने लोकांना दारूचे व्यसन सोडवण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत दारू सोडणाऱ्या व्यक्तीच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. एवढेच नाही तर दारूचे व्यसन असलेले अनेक लोकही या मोहिमेचा भाग झाले असून काल 15 ऑगस्टला आपापल्या गावांसमोर दारू कायमची सोडण्याची शपथ घेतली आहे.

Quit Liquor Get Scholarship for Kids
75th Independence Day: महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणाण्याचे दिले निर्देश

100 हून अधिक गावांमध्ये सुरू केलेला उपक्रम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पंचायत समितीने लोकांना दारू पिण्यापासून रोखण्यासाठी तहसीलमधील 100 हून अधिक गावांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. 'मद्यपान थांबवा आणि मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळवा' (Quit Liquor Get Scholarship for Kids) असे या उपक्रमाचे नाव आहे.

शिष्यवृत्ती कधी आणि कशी दिली जाईल

या मोहिमेबद्दल ब्लॉक विकास अधिकारी (BDO) म्हणाले की, दारू सोडण्याच्या ठरावाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या मुलांना एक वर्षानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 2023 रोजी शिष्यवृत्ती दिली जाईल. आणि दारू सोडण्यासाठी जे लोकं शिष्यवृत्ती देणार अशा लोकांनाही सन्मानित केले जाईल.

Quit Liquor Get Scholarship for Kids
Sindhudurg News: मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल वसूलीची तारीख निश्चित नाही

या मोहिमेबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह

स्थानिक लोकांमध्ये या मोहिमेबाबत प्रचंड उत्साह आहे. याबाबत मोहन कोपनर नावाचे ग्रामस्थ म्हणाले, 'मी शेतमजूर असून मला एक मुलगा व दोन मुली आहेत. मी अनेक वर्षांपासून दारू पीत आहे. ही योजना ग्रामसभेत सांगितली जात असताना माझ्या मुलांनाही शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी माझ्या मुलांसाठी दारू सोडण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या निर्णयाने माझे कुटुंब खूप आनंदी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com