Sindhudurg News: मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल वसूलीची तारीख निश्चित नाही

ओसरगाव टोल नाका
ओसरगाव टोल नाका

मुंबई-गोवा महामार्गावर असलेला ओसरगाव टोल नाका (Osargao Toll Plaza) येथील टोल वसूलीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून ओसरगाव टोलनाका येथे टोल वसूली 16 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, या वृत्ताचे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खंडन करत, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन केले आहे.

ओसरगाव येथील टोल वसूली उद्या म्हणजेच 16 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिलासा दिला असून, टोल वसूलीची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

ओसरगाव टोल नाका
'पुढील 3 तासांत कुटुंबाला संपवणार' मुकेश अंबानींना आला धमकीचा फोन

शिंदे सरकारमध्ये दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खाते

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना रविवारी (दि.14) खाते वाटप करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं देण्यात आले आहे. तर, दीपक केसरकर शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आले आहे. तसेच, पूर्वीचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com