महाराष्ट्रात 89 तलवारी, एका कट्यारसह 4 जणांना अटक; तपास सुरू

या आधी पंजाबमधून औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवडमध्येही अनेक तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत
Police seized large cache of 89 swords from Dhule arrested four people
Police seized large cache of 89 swords from Dhule arrested four peopleANI
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) शस्त्रास्त्रे पाठवण्याचा घटना घडत आहेत. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या हजरजबाबीमुळे ही गुन्हेगारी बाहेर येत आहे. पंजाबमधून आणलेल्या तलवारी औरंगाबाद पोलिसांनी जप्त केल्याच्या काही दिवसानंतरच काल पुन्हा महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात 89 तलवारी, एका कट्यारसह 4 जणांना अटक झाली आहे. काल 27 एप्रिल दिवशी ही कारवाई करण्यात आली असून एका वाहनामधून ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षकांनी माध्यमांना दिली आहे. (Maharashtra Crime)

धुळ्यातील सोनगीर गावाजवळ पोलिसांनी एका वाहनातून तलवारीचा मोठा साठा काल जप्त केला. त्यासह चार जणांनाही अटक केली आहे. वाहनासह 7,13,600 रुपये किमतीच्या 89 तलवारी आणि 1 खंजीर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून जिल्ह्याचे धुळे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले.

दरम्यान 3 आठवड्यापुर्वी पंजाबमधून आणलेल्या 37 तलवारी औरंगाबाद पोलिसांनी जप्त केल्यानंतर तेथून पाच दिवसांनी पिंपरी चिंचवड, पुणे येथे 97 तलवारी आणि दोन खंजीर जप्त करण्यात आले होते. या तलवारी आणि खंजीर दोन लाकडी पेट्यांमध्ये सापडले होते. या पेट्या पंजाबमधील अमृतसर येथील उमेश सूद याने औरंगाबाद येथील अनिल होन कडे पाठवल्याचे त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते. या सर्व अवजारांची किंमत अंदाजे 3.7 लाख रुपये होती.

दरम्यान 'धुळ्यांमध्ये तवलारी जप्त करण्यात आल्या. त्या राजस्थानमध्येच पाठवण्यात येत होत्या, त्या राजस्थान मध्ये कॉग्रेसचे सरकार आहे, त्या तवलारींचे काय काम, नेमकं कुणाला मारायचं आहे, कुणाला दंगली करायच्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कोण पाठवतं आहे. कुणाला पाठवत आहात. जिथे ह्या तलवारी पाठवण्यात आल्या आहेत,' असे भाजपनेते राम कदम यांनी उपस्थिती केले आहे. ज्या ठिकाणी कॉ़ग्रेसचे सरकार आहे तिथून ही शस्त्र येतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com