सिंधुदुर्गातला मुबंई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) खारेपाटण ते झाराप पर्यत बांधुन तीन वर्ष होत आली. सध्याच्या घडीला हायवेच 95% काम पूर्ण झालंय. उर्वरित काम राहिले आहे नांदगावमध्ये दोन ठिकाणी सर्व्हिस रोड (Service Road) अर्धवट स्थितीत आहेत.
काही सिंगल रोड सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना तसेच मिडल कट सुध्दा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय अजूनही काही जमिनीचा मोबदला दिला गेला नाही. त्यामुळे प्रशासकीय (Administrative) उदासीनतेमुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे.
2010 मध्ये हा महामार्ग रुंदीकरण बाबतचा प्रकल्प सुरू झाला होता. परंतु याचे काम हे फारच संथगतीने सुरू आहे. त्यातच अनेक ठिकाणी दर्जेदार कामे झांजलेली नाहीत. असे निदर्शनास आणून देणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयातील (High Court) वकील अॅड. ओवेस पेचकर यांनी केली. याचिकेची दखल कोर्टाने घेतली. त्यानंतर खंडपीठाने राज्य सरकारला या हायवेच्या कामाबाबत आणि त्याची प्रगती दाखवण्यासंबधीचे निर्देश जारी केले होते. त्याप्रमाणे, सार्वजनिक महामार्ग विभागाने कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्रासह (affidavit) याची सर्व माहिती कोर्टासमोर सादर केली. त्यानंतर महामार्ग रुंदीकरणाचा हा प्रकल्प डिसेंबर-2022 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बरीच प्रगती झाली असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.