Air India: धक्कादायक! मुंबईत येणाऱ्या विमानाचे हवेतच प्रवाशाकडून दार उघडण्याचा प्रयत्न

आजकाल विमानात घडणाऱ्या विविध घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी विमानात महिलेवर मृतविसर्जन केल्याची संतापजनक घटना घडली होती.
Air India
Air India Dainik Gomantak
Published on
Updated on

london to mumbai flight: आजकाल विमानात घडणाऱ्या विविध घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी विमानात महिलेवर मुत्रविसर्जन केल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर अशाच एक दोन घटना समोर आल्या होत्या.

त्यानंतर आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लंडनमधून मुंबईत येणाऱ्या विमानाचे एका प्रवाशाने दार उघण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

(Passenger tries to open Air India Aeroplan door during london to mumbai flight)

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान लंडनमधून मुंबईत येत होते. त्यावेळी एक प्रवाशी विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान करत होता. त्यानंतर विमानातील स्मोक अलार्म वाजू लागले. त्यामुळे विमानतील कर्माचारी स्वच्छतागृहाकडे धावले.

विमानातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला धुम्रपान करण्यापासून मज्जाव केला. दरम्यान, यावेळी या माथेफीरू प्रवाशाने चक्क विमानाचे दारच उघडण्याचा प्रयत्न केला.

Air India
Umesh Pal Case: उमेश पाल हत्याकांडातील कॉन्स्टेबल हत्येचा व्हिडिओ समोर, बॉम्बस्फोट झाला अन्...

त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचे हात आणि पाय बाधून त्याला आत आणले. एअर इंडियाचे विमान लंडनमधून मुंबईत उतरल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्यावर गंभीर कलामाखाली गुन्हे दाखल केले आहेत.

विमानाचे दार उघडले तर काय झाले असते?

विमानाचे दार उघडले असते तर हवेच्या दाबामुळे विमानातील सर्व प्रवाशी बाहेर फेकले गेले असते. आणि यात अनेकांचा मृत्यू झाला असता. विमानात धुम्रपानास बंदी असते. तरी या नियामाचे प्रवाशाने उल्लंघन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com