न्यूयॉर्कहून परतलेल्या व्यक्तीला कोविड-19 लसीचे तीन डोस घेऊन देखील कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शुक्रवारी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पुरुषाची न्यूयॉर्कहून (New York) परतल्या वर 9 नोव्हेंबर रोजी शहरातील विमानतळावर (Airport) कोविड-19 (COVID-19) चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. चाचणीनंतर त्याला ओमिक्रॉनची (Omicron variant) लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या मुंबईत ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 14 वर गेली आहे. यामध्ये मुंबईबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. मात्र, यातील 13 रुग्णांना यापूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत आढळलेल्या 14 ओमिक्रॉन रुग्णांपैकी एकाही रुग्णामध्ये ओमिक्रॉनची
गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती बीएमसीच्या (BMC) अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रुग्णांची राज्यव्यापी संख्या 40 वर पोहोचली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.