मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका स्कुटरची व तिच्या मालकाची आणि एका गाढवाची गोष्ट चांगलीच व्हायरल होत असून, इलेक्ट्रिक स्कूटर बंद पडल्यावर ओला कंपनीने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने रागाच्या भरात मालकाने ही वरात काढली आहे. (Ola scooter broke down in beed)
त्याचा आता व्हीडिओ ही व्हायरल झाला आहे. बंद पण नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनहीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईक मकाने ही इलेक्ट्रिक बाईकवाचून शहरात फिरवून गावभर चर्चा झाली. ही घटना बीड जिल्ह्यातील आहे. बीड जिल्ह्यात एका व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटरला विरोध केला. सचिन गिते असं या व्यक्तीचे नाव आहे.
पण ही स्कूटर बंद पडल्याने सचिन यांना राग आला त्यांनी गाढवाच्या पाठीमागे स्कुटर बांधत निषेध व्यक्त केला. सचिन गिते यांनी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्यानंतर सहा दिवसांनंतर स्कुटर चालायला प्रॉब्लम येऊ लागला. मग त्यांनी ओला कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर ओला मेकॅनिकने त्याची स्कूटर तपासली. पण ते दुरुस्त करण्यासाठी कुणीही आलं नाही. सचिन गिते यांनी कस्टमर केअरला अनेक फोन केले. मात्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी ही अशी मिरवणूक काढली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.