ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल कोश्यारी यांनी केली स्वाक्षरी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर सही केली आहे.
Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh KoshyariDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका राजकीय मुद्याबाबत भोवती फिरत होतं ते म्हणजे ओबीसी आरक्षण. यासंदर्भात ठाकरे सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा ठाकरे सरकारकडे पाठवला होता. यानंतर आघाडी सरकारने त्यात आवश्यक ते बदल करुन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठविल्यानंतर आज अखेर राज्यापालांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि आपल्या मंजुरीची मोहोर उमटवली. त्यामुळे आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Governor Bhagat Singh Koshyari
Breaking: राज्यकर्तेच ईडीचा खेळ खेळत आहेत, राज ठाकरेंचा घणाघात

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. राज्यापालांनी राज्य मंत्रिमंडळाने पाठवलेल्या अध्यादेश मंजूप केला यासाठी आम्ही राज्यपाल कोश्यारी यांचे आभारी आहोत. अनेकदा काही शंका असतील, तर राजभवन त्याची खात्री करुन घेत असतं. त्यानुसार आम्ही त्यांचं योग्य ते निरसन करुन अध्यादेश पुन्हा एकदा राज्यपालांकडे पाठवला होता. आणि आज अखेर राज्यपालांनी मंजूरी दिली आहे, असे भुजबळ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com