Maharashtra: आता डेंग्यू, चिकगुनियाने वाढवली चिंता, तिपटीने वाढले रुग्ण!

राज्यात कोरोनाचा सावट (Covid 19) असताना दुसरीकडे आता डेंग्यू, चिकनगुनिया (Chikungunya) सारख्या आजरांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
Dengue
DengueDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात कोरोनाचा सावट (Covid 19) असताना दुसरीकडे आता डेंग्यू (Dengue), चिकनगुनिया (Chikungunya) सारख्या आजरांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. मागील वर्षी याच काळामध्ये वाढलेल्या रुग्णांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी या दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत तब्बल तिपटीने वाढ झाली आहे. यामध्येच नाशिक आणि पुण्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागले आहेत. त्याचबरोबर नाशिक (Nashik) महानगर पालिकाक्षेत्रामध्ये देखील रुग्णसंख्या वाढ लागू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने (Thackeray government) आता 15 महानगर पालिकांना तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ब्रीडिंग साईट चेकर्स नियुक्त करण्याचे देखील निर्देश ठाकरे सरकारने दिले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यामध्ये 14 सप्टेंबपर्यंत 6 हजार 374 डेंग्यूचे रुग्ण तर 1 हजार 537 चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासोबत 11 रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू देखील ओढावला आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीशी तुलना केली असता, तर याच काळात मागील वर्षी डेंग्यूचे 2 हजार 029 रुग्ण तर दुसरीकडे चिकनगुनियाचे केवळ 422 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आकडेवारीनुसार डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये चिप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Dengue
अमरावतीच्या वर्धा नदीत भिषण अपघात,11 निष्पापणा जलसमाधी

शिवाय, 15 सप्टेंबर रोजी ठाकरे सरकारने काढलेल्या आदेशानुसार, एकूण 15 गंभीर धोका असलेल्या महानगर पालिकांना तात्काळ यासंदर्भात पावले उचलण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना ब्रीडिंग साईट चेकर्स अर्थात डेंग्यूच्या डासांची पैदास होणाऱ्या ठिकाणांचं परिक्षण करण्याऱ्या लोकांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे चेकर्स दैनंदिन 200 घरांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर डासांचे परिक्षण करण्यात येत आहे. यासाठी दिवसाला 450 रुपये हप्ता या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्याचबरोबर या कामासाठी तब्बल 39 लाख 38 हजार रुपयांचा निधी देखील देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारच्या 470 आरोग्य कर्मचाराऱ्यांना हे काम देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Dengue
राजस्थानमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

चिकनगुनिया, डेंग्यूचे वाढते रुग्ण

पुणे महानगर पालिकेमध्ये सुमारे 70 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर नाशिक, पिंपरी चिंचवड, ठाणे, कोल्हापूर आणि इतर काही नगरपालिकांमध्ये प्रत्येकी 25 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com