Cracks on Atal Setu: ‘अटल सेतूला तडे गेले नाहीत, अफवा टाळा’; काँग्रेसच्या दाव्यावर एमएमआरडीएने स्पष्टच सांगितले

Cracks on Atal Setu: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूची पाहणी केली.
Cracks on Atal Setu
Cracks on Atal Setu
Published on
Updated on

Cracks on Atal Setu: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांना सेतूला तडे गेलेले दिसले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना पटोले म्हणाले की, ‘’सरकार जनतेसाठी काम करत असल्याचा आव आणत आहे, मात्र इथे स्पष्टपणे भ्रष्टाचार दिसतो. ते आपले खिसे भरण्यात व्यस्त आहेत. मला त्यांना विचारायचे आहे की लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? हे भ्रष्ट सरकार कसे हटवायचे याचा प्लॅन आता जनतेनेच करावा. या सेतूला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले असून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. मात्र या सेतूला त्यांचे नाव देऊनही येथे भ्रष्टाचार सुरु असल्याने हे दुर्दैवी चित्र आहे.’’

मात्र आता, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पटोले यांच्या दाव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एमएमआरडीएने म्हटले की, ‘अटल सेतूच्या मुख्य भागाला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.’

अटल सेतू पूल बांधणाऱ्या स्ट्राबॅग या कंपनीचे अधिकारी कैलाश गणात्रा यांनीही सांगितले की, ‘’अटल सेतूला जोडणाऱ्या अप्रोच रोडवर किरकोळ भेगा पडल्या आहेत. परंतु सदर फुटपाथ हा मुख्य पूलाचा भाग नसून पूलाला जोडणारा सर्व्हिस रोड आहे. तडे प्रोजेक्टमधील संरचनात्मक दोषांमुळे गेलेले नाहीत. पूलाच्या संरचनेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही हे देखील लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.’’

Cracks on Atal Setu
Mumbai Goa Highway: परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक

अटल सेतू हा मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा पूल आहे. हा पूल बांधण्यासाठी एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6-लेन पूल आहे. समुद्रापासून त्याची लांबी सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. या पूलाच्या बांधकामामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिविटी सुलभ झाली आहे. यासोबतच मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com