Adnan Ali Sarkar Arrested: एनआयए ला मोठे यश, ISIS शी संबंधित पुण्यातील डॉक्टरला अटक

ISIS: एनआयएला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. ISIS च्या मॉड्यूलचा पर्दाफाश करत पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
Adnan Ali Sarkar
Adnan Ali SarkarDainik Gomantak
Published on
Updated on

NIA arrested a Pune Dr. Adnan Ali Sarkar linked to ISIS: महाराष्ट्रात एनआयएने ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली. डॉ.अदनानाली सरकार असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

आरोपींकडून ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एनआयएने आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ISIS या दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी पुण्यातून एका डॉक्टरला अटक केली. कोंढवा भागातील डॉ.अदनानाली सरकार यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली.

जप्त केलेल्या कागदपत्रांवरून असे समोर आले आहे की आरोपी डॉक्टर आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणांना इसिसकडे आकर्षित करत असे. मग त्यांची भरती करून तो हिंसक अजेंड्याला चालना देत असे. ISIS च्या कारवाया पुढे नेण्यासाठी त्याने संपूर्ण कट रचला होता.

Adnan Ali Sarkar
Manipur Violence Video: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सीबीआय करणार चौकशी, व्हिडिओ बनवणारा फोन जप्त

एनआयएच्या तपासानुसार आरोपी भारत सरकारच्या विरोधात मोठा कट रचत होते. देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला हानी पोहोचवण्यासाठी ते महाराष्ट्र ISIS मॉड्यूलद्वारे मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. NIA ने 28 जून रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता आणि ही पाचवी अटक आहे.

Adnan Ali Sarkar
Jharkhand Crime: माणुसकीला काळिमा! झारखंडमध्ये महिलेला विवस्त्र करुन बेदम मारहाण, पोलिसांनी...

यापूर्वी एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोध घेतल्यानंतर ३ जुलै रोजी मुंबईतून चार जणांना अटक केली होती.

मुंबईचा ताबीश नासिर सिद्दीकी, पुण्याचा जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि शरजील शेख आणि ठाण्यातील जुल्फिकार अली बडोदावाला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com