'केवळ उसापासून साखर असा विचार नको, आता इथेनॉलकडे वळलं पाहिजे'

उसाची शेती इतकी वाढायली आहे की, गाळप कसे करायचे हा प्रश्न पडायला लागला आहे : शरद पवार
Sharad Pawar
Sharad Pawardainik gomantak
Published on
Updated on

शिराळा (सांगली) : केवळ उसापासून साखर असा विचार करुन आता चालणार नाही. तर आपल्याला इथेनॉलकडे वळलं पाहिजे असं म्हणताना, साखरेच्या कर्जाचे व्याज कारखान्यावर येतं, त्यामुळं वेगळं काही करता येत का हे पाहावं लागेल असे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शिराळा येथे भाजप नेते, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते. (NCP president Sharad Pawar said that It's time we shifted from sugar to ethanol)

तसेच त्यांनी राज्याच्या वाढलेल्या उसाच्या शेतीवर (sugarcane cultivation) बोलताना, आपल्याला काळजी वाटतं असल्याचे बोलले आहे. तर पाणी दिसलं की लाव ऊस असं न वागता वेगळा विचार करायला हवा. ब्राझील, अमेरिकासारख्या देशाप्रमाणे अपल्याला विचार करायला हवा. ते इथेनॉलचा (Ethanol) वापर जास्त करतात आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल असेही पवार म्हणाले.

तसेच शरद पवार यांनी शिराळ्याच्या जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना, योग्य असेल तर पाठींबा द्यायला आणि योग्य नसेल तर वेगळी भूमिका घ्यायला हा भाग कधी मागे पडला नसल्याचे सांगितले. शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीचेच (NCP) होते ते आज पुन्हा घरी परतत आहेत, त्याचा मला आनंद असल्याचे पवार म्हणाले. तसेच या भागातील जवळपास सर्व प्रश्न सुटत आलेले दिसत असून आपल्याला त्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
पाडव्याच्या शुभेच्छा देत सेनेचा केंद्राला टोला

मात्र, वाढलेल्या उसाच्या शेतीमुळे आपल्याला चिंता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मे अखेरपर्यंत साखर कारखाने (Sugar factory) सुरु राहतील असे दिसत असल्याचेही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपण ऊस आणि कारखाने बाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांच्याकडे सतत चर्चा होत असल्याचे सांगितले. तसेच या भागातील गेल्या काही वर्षात अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली आहे. येणाऱ्या काळात राहिले प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असेही पवार म्हणाले.

त्याचबरोबर पवार यांनी देशाचं राजकारण वेगळ्या दिशेनं जातं असून धर्माच्या नावानं देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले. हा देश राज्य वेगळ्या विचार करणाऱ्यांच्या हातात आहे. आपल्याला धर्मांध शक्तीच्या विरोधात लढाई करावी लागणार असल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com