Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला दुखापत

परळीकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं पोस्टमधून म्हटले आहे.
Dhananjay Munde NCP
Dhananjay Munde NCP Dainik Gomantak

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने फेसबुक व ट्विटरवर (Facebook And Twitter) पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. परळीकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं पोस्टमधून म्हटले आहे.

(NCP MLA Dhananjay Munde meet with car accident in Beed)

Dhananjay Munde NCP
Maharashtra: राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवस संपावर, वाचा संपाचे कारण काय?

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाची पोस्ट काय?

"मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये."

Dhananjay Munde NCP
MSRTC: ठाण्यात धावत्या एसटी बसला आग, 65 प्रवाशी थोडक्यात बचावले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे सातारा जिल्ह्यातील आमदार जयकुमार गोरे यांचा देखील अपघात झाला होता. अधिवेशन उरकून घरी परत जात असताना फलटण येथे त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com