26 जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात (RDC) राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी प्रथम क्रमांक बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपला तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधानांचा ध्वज हा बहुमान मिळाला आहे. तर मुंबईची पृथ्वी पाटील हीने देशभरातून अव्वल येत मानाचा गॉड ऑफ ऑनरचा मान पटकावला आहे. ती देशभरातून सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरली. तसेच पुण्याचा शंतनु मिसाळ हा देशातून चौथा आल्याची माहिती ब्रिगेडीअर आर. के. गायकवाड यांनी दिली. 3 क्षेत्रामधुन झालेली ही निवड महाराष्ट्रासाठी (Maharashtra)अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
शुक्रवारी करिअप्पा ग्राउंड येथे झालेल्या पंतप्रधान रॅलीनंतर प्रतिष्ठेचा पीएम बॅनर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र एनसीसीच्या चमूला एका दिमाखदार सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खांडुरी यांनी संचालनालयाच्या वतीने हे पारितोषिक स्वीकारले. तसेच सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधवने प्रतिष्ठेच्या ‘पीएम बॅनर’ तर, कॅडेट कॅप्टन निकिता खोत हिने ट्रॉफी स्वीकारली. यापूर्वी महाराष्ट्र पथकाला 2002 ते 2014 दरम्यान सलग सहा वेळा विजेते पद मिळाले होते तर 2020, 2021 मध्ये महाराष्ट्राकडे उपविजेतेपद आले होते तर आता पुन्हा विजेतेपदाचा बहुमान हा राज्याच्या एनसीसी कॅडेट्सनी महाराष्ट्राला मिळवून दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून 57 कॅडेट्सची निवड
यावर्षी राज्यभरातून शिबिरासाठी 57 कॅडेट्सची निवड झाली होती. 57 मध्ये एकूण 13 कॅडेट्स मुंबईतील आहेत. 13 मध्ये दहा कॅडेट्स मुंबई ‘ब’ तर तीन छात्रसैनिक मुंबई ‘अ’ गटातील आहेत. या 13 मध्ये 10 कॅडेट्स मुले तर तीन मुली आहेत. मुंबईत एनसीसीचे दोन गट असून त्यामध्ये 21 युनिट्स आहेत. शिबिरात निवड झालेले 13 कॅडेट्स या 21 युनिट्समधील आहेत. या विद्यार्थ्यांना लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्हा आणि मेजर आरूष शेटे यांनी मार्गर्शन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.