Aryan Khan Updates: आर्यन खानची एनसीबीची एसआयटी टीम करणार चौकशी

आता आज दिल्लीहून मुंबईत पोहोचलेल्या एनसीबीच्या एसआयटीच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाणार आहे.
Aryan Khan
Aryan KhanDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आता आर्यन खानची (Aryan Khan case) दिल्लीतील एनसीबीची एसआयटी टीम चौकशी करणार आहे. या प्रकरणात अन्य आरोपींसोबत आर्यन खानचीही चौकशी केली जाऊ शकते, अशी बातमी एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. आर्यन खानला एनसीबीने समन्स बजावले आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना या प्रकरणातून वेगळे करण्यात आले आहे. आता आज दिल्लीहून मुंबईत पोहोचलेल्या एनसीबीच्या एसआयटीच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. संजय सिंह या अधिकारी तपासाचे नेतृत्व करत आहेत. अरबाज मर्चंट, अचित कुमार यांच्यासह शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि आर्यन खान यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र त्याच्यासमोर जामिनासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. तपास अधिकाऱ्यांना माहिती दिल्याशिवाय तो मुंबई आणि देशाबाहेर जाऊ शकत नाही. तो या प्रकरणाशी संबंधित आरोपींच्या संपर्कात राहणार नाही. त्याला दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर राहून चौकशीत सहकार्य करावे लागणार आहे. तपासाशी संबंधित गोष्टी मीडिया किंवा सोशल मीडियावर शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय आर्यन खानला त्याचा पासपोर्ट स्पेशल एनडीपीएस कोर्टात जमा करायचा आहे.

Aryan Khan
आर्यन खानला आजही जेलची हवा; सर्वांना नियम सारखेच

समीर वानखेडे आता आर्यन खान प्रकरणाच्या तपासाचा भाग नाहीत

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता आर्यन खान प्रकरणाच्या तपासाचा भाग नाहीत. आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले समीर वानखेडे आता या तपासापासून अलिप्त झाले आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांचे म्हणणे आहे की, या तपासापासून आपण स्वत:ला दूर ठेवले आहे. आता रविवारी दिल्लीहून मुंबईत पोहोचलेली एनसीबीची एसआयटी टीम आर्यन खानशी संबंधित क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित आरोपींना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये आर्यन खानचाही समावेश असेल. तसेच आर्यन खानला वाचवण्यासाठी किरण गोसावी, सॅम डिसोझा, सुनील पाटील यांसारख्या लोकांसोबत 18 कोटींची डील केल्याच्या आरोपावरुन शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीलाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com