महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर सुध्दा भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन केले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी म्हटले आहे की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असायला हवा, मात्र त्याच्या नावाखाली द्वेष पसरवणे चुकीचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीही हाच संदेश दिला आहे.
भाजपचे हे हिंदुत्व संधिसाधू
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने(Shivsena) हिंदुत्व नाही तर, भारतीय जनता पक्ष (Bjp) सोडला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपचे संधिसाधू हिंदुत्व हे केवळ सत्तेसाठी आहे. हिंदुत्वासाठी सत्ता हवी असल्याने शिवसेनेने भाजपसोबत युती केली. पण सत्ता मिळविण्यासाठी कधीही शिवसेनेने हिंदुत्वाचा वापर केला नाही.
या संदर्भात राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुध्दा मत व्यक्त केले. ते म्हणाले की, "प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे, परंतु एकमेकांबद्दल द्वेष करणे हे हानिकारक आहे." आम्ही सुध्दा हेच सांगू इच्छितो की, प्रत्येकाने आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे. पण एकमेकांविरुद्ध द्वेष पसरवणे चुकीचे हे साफ चुकिचे आहे. मला विश्वास आहे की, उद्धव ठाकरे यांनी सुध्दा त्यांच्या भाषणात हेच सांगितले आहे.
निवडणूक आयोगावर ओढले ताशेरे
शिवाय नवाब मलिक (Nawab Malik) यांनी निवडणूक आयोगावर सुध्दा ताशेरे ओढले. नवाब मलिक म्हणाले की, कोणत्याही धर्माच्या नावावर मते मागणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांपासून धर्माच्या नावावर मतांच्या मागणीबाबत निवडणूक आयोग गप्प आहे आणि ही निवडणूक आयोगाची (Election Commission) लाचारी आहे. याबाबत आयोगाने याचा पुन्हा विचार करावा, अन्यथा आयोग आपली विश्वासार्हता गमावून बसेल, असे आम्हाला वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.