भाजप आणि NCB मिळून मुंबईत दहशत माजवतायत: नवाब मालिक

भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.
Nawab Malik: BJP & NCB is trying to unstable Mumbai & Maharashtra
Nawab Malik: BJP & NCB is trying to unstable Mumbai & Maharashtra Dainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यापासून राष्ट्रवादी काँगेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी (NCB) आणि बीजेपीला (BJP) टार्गेट करत आहेत. या धाडीबद्दल अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत अनेकवेळा त्यांनी थेट NCB वर रोप देखील केले आहेत. आता अनेक मुद्द्यांवरून पुन्हा एकदा नवाब मलिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.(Nawab Malik: BJP & NCB is trying to unstable Mumbai & Maharashtra)

Nawab Malik: BJP & NCB is trying to unstable Mumbai & Maharashtra
NCB ने आर्यनची केलेली चौकशी खरी कि खोटी नवाब मालिकांचा सवाल

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी यंत्रणांचा आणि अशा अनेक प्रकरणाचा वापर कसा केला जातोय याचे देखील आहेत आणि ते पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत, मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल अशी सांगत त्यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या पूर्वी जेंव्हा NCB अशा धाडी टाकत होतु तेंव्हा रेव्ह पार्टीत जे संशियत सापडत होते त्यांची रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना तात्काळ सोडले जायचे. आणि कालांतराने जर त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले तरच त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाहीत.आणि असे करून NCB नेमकं काय लपवत आहे असा सवाल करतच ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही.असा हल्लाच त्यांनी NCB वर चढवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com